HW Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | भाजप वारंवार इतकं खोटं का बोलतं ?


आज सकाळी व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत होता. “देवेंद्र फडणवीस हे केवळ केंद्राकडून आलेला ४० हजार कोटींचा निधी केंद्राला परत पाठवण्यासाठी ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले”, अशा आशयाचा या मेसेज होता. खरंतर असे अनेक खरे-खोटे मेसेज दर दिवशी सोशल मीडियावर सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे त्यांना तितकं गांभीर्याने घेतलं जात नाही. मात्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांबाबत फिरणाऱ्या या मेसेजला खुद्द भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनेच दुजोरा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडणं साहजिक आहे. केंद्राने राज्याला दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचवता यावेत यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. एका क्षणासाठी हा दावा जर खरा मानला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.

Related posts

Nitin Gadkari | सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो,गडकरींची टिका

Arati More

Dhananjay Munde, Jayant Patil | प्रकाश मेहतांवर कारवाई होणार का ?

News Desk

Amol Kolhe And Aditya Thackeray | आशिर्वाद यात्रा काढून काय साध्य होणार?

News Desk