HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांना शिवसेनेचा दणका? शिवसेना-राष्ट्रवादीत तणावाची शक्यता

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाली आहे. ही तरुणी नॉट रिचेबल असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. एकीकडे या प्रकरणावरून मेहबूब शेख यांना भाजपकडून मोठ्या प्रमाणात कोंडीत पकडले जात असताना आता चक्क शिवसेनेनेच राष्ट्रवादी आणि मेहबूब शेख यांना दणका दिल्याचे म्हटले जात आहे.शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी मेहबूब शेखला मोठा दणका दिला आहे. या प्रकरणात समरी रिपोर्टची शक्यता लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मागणी नीलम गोर्हे यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नीलम गोर्हे यांनी हि आपली मागणी केली आहे. शिवसेनेने घेतलेली ही भूमिका म्हणजे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया सविस्तर प्रकार.

#MahebubShaikh #NeelamGorhe #NCP #Shivsena #UddhavThackeray #SharadPawar #RohitPawar #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपाने आपल्या किती मंत्र्यांचे राजीनामे घेतले ?

News Desk

नवशक्ति : व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी ‘ती’ची लढाई

News Desk

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया

News Desk