HW News Marathi
व्हिडीओ

शत्रुत्व विसरून Eknath Khadse, Girish Mahajan जळगावात एकत्र!’ही’ निवडणुक एकत्र लढणार?

जळगावमधील भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आल्याच आता पाहायला मिळाले. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि यावेळी दोन्ही नेत्यांची भाजपच्या कार्यालयात भेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांची ही बैठक बोलावण्यात आली होती, विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खडसे हे भाजपच्या बैठकीत दिसून आले विशेष म्हणजे , गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहेत . आणि आता दोन्ही नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर काहीच्या भुवया देखिल उंचावल्या, मात्र असं जरी असलं तरी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केल्याचे यावेळी पाहायला मिळाल. राजकारणातलं शत्रुत्व बाजूला ठेवत फक्त जळगाव जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सकारात्मकता दर्शवली.

#EknathKhadse #Jalgaon #NCP #GirishMahajan #Jalgaon #MarathiNews #GulabraoPatil #PoliticalNews #HwnewsMarathi #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धोकेबाज कोण हे मतदानातून जनता दाखवेल! – Chandrashekhar Bawankule

News Desk

‘अजित पवारांनी पुण्याला जास्त वेळ द्यावा’ लाॅकडाऊनबाबत महापौर काय म्हणाले ? Murlidhar Mohol | Ajit Pawar

Adil

MIM नेते Akbaruddin Owaisi वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; BJP ची मागणी

News Desk