HW News Marathi
व्हिडीओ

Girish Mahajan- Gateway of BJP |संकटमोचक ” गिरीश महाजन “

सरकारच्या मदतीला धावून येण्याच्या गिरीश महाजनच्या या वृत्तीची तुलना प्रमोद महाजन यांच्याशी केली जाऊ लागलीये, ज्याप्रमाणे प्रमोद महाजन हे केंद्रात समेट घडवून आणण्यात आघाडीवर होते तसेच आता युतीमधल्या घटक पक्षांचा रुसवा लक्षात घेऊन त्यांना सोबत आण्यासाठी गिरीश महाजन यांनी केलेली कामगिरी भाजपासाठी खूप महत्वाची आहे . आपल्या जामनेर मतदारसंघात त्यांचं मोठं काम आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या तालमीत आणि आधिपासूनचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या चळवळीतून आलेले गिरीश महाजन हे आत्ताच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे सगळ्यात जवळचे मानले जातात. त्यांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांना गिरीश महाजचं आठवतात.

वाटाघाटी करण्यात एकदम तरबेज आणि पटाईत … भाजपने जरी मुलं पळवली असली तर मग कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने त्यांना का जाऊ दिल ? आपापल्या नेत्यांना सांभाळण्यात ते अयशस्वी झालेत कि गिरीश महाजन यांचं मन वळवण्याचx कसब काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जरा जास्तीच जड जातंय.. भाजपाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनीसुद्धा मागे एकदा माझ्या पक्षात गिरिश महाजन यांच्यासारखा संकटमोचक नेता असता तर मी बारामतीची जागा सुद्धा जिंकली असती अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलयं …थोडक्यात काय सध्या भाजपामध्ये गिरीश महाजन यांच्या नावाला भरभक्कम वजन आलयं. त्यांना आता भाजपचे गेटवेचं म्हणावं लागेल!! #GirishMahajan #BJP #GatewayOfBJP #Loksabha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde-Pankaja Munde | परळी मतदारसंघात मुंडे भाऊ-बहिणीमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Gauri Tilekar

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय निरुपम

News Desk

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी Raj Thackeray यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

News Desk