HW News Marathi
व्हिडीओ

महात्मा गांधी आणि महिला सक्षमीकरण, असा आहे राष्ट्रपित्याच्या कल्पनेतील आदर्श समाज

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, “ज्या सर्व वाईट गोष्टींसाठी पुरुषाने स्वतःला जबाबदार धरले त्यापैकी कोणतीही गोष्ट इतकी अपमानजनक, इतकी धक्कादायक किंवा क्रूर नाही जितकी त्याने एखाद्या स्त्री अत्याचार केला ही आहे.” महात्मा गांधींचे हे बोल आजच्या काळात विशेषतः आजच्या देशातील स्थितीत अत्यंत समर्पक ठरतायत.

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीचे जे काही झाले त्या अशा भारताची आपल्या राष्ट्रपित्यांनी कल्पनाही केली नसेल. मात्र, आजपासून जवळपास 100 वर्षांपूर्वी महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे महात्मा गांधींचे विचार आज नीट समजून घेणे आणि आचरणात आणणे महत्तवाचे आहे. गांधीजींनी नेहमीच महिलांना समान आणि सन्मानाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला.

महात्मा गांधींचे महिलांबद्दलचे विचार ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून समोर आले. त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी महात्मा गांधींचे विचार अगदी दृढ होते. यासाठी एक उदाहरण म्हणून आज बापूंच्या विचारांची उजळणी करण्याची वेळ आली आहे.

अशा वेळी देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेलेला असताना तब्बल ९९ वर्षांपूर्वी १५ सप्टेंबर १९२१ रोजी यंग इंडियामधील बापूंचे विधान आजच्या स्थितीतही चपखल बसत आहे.

#GandhiJayanti #WomenEmpowerment #HathrasHorror #HathrasCase #UPPolice #NarendraModi #India

#YogiResignNow #UttarPradesh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi महाराष्ट्राला टार्गेट का करतायत?; ज्येष्ठ राजकीय विश्लेषक Hemant Desai यांचं विश्लेषण

News Desk

पुढील 8 दिवस Mount Mary जत्रेचा उत्साह, वांद्रात जत्रेला भाविकांची मोठी गर्दी

Darrell Miranda

सत्ता आम्ही कमवायची असते, त्यासाठी साकडं नाही घालत BJP नेत्यांवर Pankaja यांचा रोख

News Desk