मुंबईमध्ये मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दशकांमधील सर्वात मोठा विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेची थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या प्रकरणी राज्याचा गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत या प्रकरणी नेमके काय म्हणालेत ? पाहूया. त्याचप्रमाणे, हे प्रकरण काय ? ते देखील जाणून घेऊया
#UddhavThackeray #AnilDeshmukh #NitinRaut #Mumbaipoweroutage #MumbaiPowerCut #PowerCut #CyberCrime #IndiaChina #China #Mumbai #GalwanValley