HW News Marathi
व्हिडीओ

Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताला मोठे यश आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) अखेर हेरगिरीच्या कथित आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन करण्यात आले असून कुलभूषण यांचे राजनैतिक अधिकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यालयाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली होती.आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५-१ अशा मोठ्या फरकाने हा निर्णय देण्यात आला आहे. भारतीय दूतावासासह पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ मोहम्मद फैसल आंतराष्ट्रीय न्यायालयात हजर आहेत. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात १६ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. या न्यायधीशांपैकी १ भारतीय, १ पाकिस्तानी न्यायाधीशांसह अन्य देशांच्या न्यायाधीशांचा देखील समावेश आहे.#KulbhushanJadhav

#KulbhushanVerdict

#IndiaVsPakistan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

News Desk

कोरोना घोटाळा ? निगेटिव्ह रिपोर्टस पॅाझिटिव्ह करून राज्यात रूग्णसंख्या वाढवली जातेय ?

News Desk

आमचा वापर फक्त मतांसाठी होतो; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी Banjara समाज आक्रमक

News Desk