HW News Marathi
व्हिडीओ

मराठीत बोलण्यास नकार ! ‘त्या’ लेखिकेच्या आंदोलनानंतर ‘मनसे’ आक्रमक, नेमकं प्रकरण काय ?

मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील एका ज्वेलर्सला मनसेने चोप दिला. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सकाळी आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी दुकानदाराला चोप दिला. दरम्यान, मनसेनंतर शिवसेना देखील या प्रकरणावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर संबंधित सराफाने माफी देखील मागितली आहे. मात्र, हे प्रकरण नेमकं काय घडलं ? हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केली असता ते नेमकं काय म्हणाले पाहूया.

दरम्यान, आता अखेर हे प्रकरण मिटले असून मनसेकडून सराफाला इशाराही देण्यात आला आहे. जोपर्यंत मराठी शिकत नाही तोपर्यंत दुकान उघडायचं नाही. त्याचप्रमाणे, असा प्रकार घडला तर प्रत्येकवेळी मनसे आपल्याच शैलीत त्याला उत्तर देईल असाही इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

#MNSAdhikrut #RajThackeray #Marathi #Maharashtra #Mumbai #WriterShobhaDeshpande #ShobhaDeshpande #SandeepDeshpande #AvinashJadhav

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

4 मेला येणार Rana दाम्पत्याचा निकाल, काय म्हणाले सरकारी वकील Pradeep Gharat?

News Desk

“बीडमध्ये महाविकासआघाडीचा धर्म पाळलाच जात नाहीय”; Omraje Nimbalkar कडाडले; Dhananjay Munde कात्रीत?

News Desk

“मुख्यमंत्र्यांचा मुलगा षडयंत्र रचतो”; धमकीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

News Desk