HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane Vs Deepak kesarkar |पराभवाची हॅट्रिक चुकवायची आहे ? मग राणेंनी निवडणुक लढवू नये !

शिवसेना नेते आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडलं. राणेंनी हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा निवडणूक लढवू नये, असं केसरकर म्हणाले. नारायण राणे हे विधानसभेची निवडणूक कुडाळ-मालवण या मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला.केसरकर म्हणाले, “नारायण राणे हे दोनवेळा हरले आहेत. गेल्या विधानसभेला कुडाळमधून हरले, तर पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल, तर पुन्हा राणेंनी निवडणूक लढवू नयेनारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यांनी सर्वोच्च पदे भूषविली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे तरूण तडफदार आहेत, त्यांचा चांगला संपर्क आहे. ते निवडून येतील, असं दीपक केसरकर म्हणाले.गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर वर्षभराने वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी हरवलं होतं.#NarayanRane #deepakKesarkar #NiteshRane #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mungantiwar यांना सत्ता नसल्याचा पश्चाताप; Vijay Wadettiwar यांची टीका

News Desk

जर महाराष्ट्रातल्या महिला संतापल्या तर…! मनीषा कायंदे यांचा अब्दुल सत्तारांना इशारा

News Desk

Shivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध !

Gauri Tilekar