HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीवर संक्रात! नवाब मलिकांचे जावई समिर खान यांना अटक,नेमकं प्रकरण काय?

सध्या राजकीय वर्तुळात नव्या विषयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात झाली… राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा केलेला आरोप आणि ते पुर्ण प्रकरण ताजं असताना राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जोरदार झटका मिळाला… नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात काल अटक करण्यात आली आहे.तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. खान यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने धाड टाकली. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत.

#NawabMalik #SamirKhan #NiloferKhan #NCP #DhananjayMunde #SharadPawar #UddhavThackeray #NCB

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नवीन वळण येणार!- Raosaheb Danve

News Desk

उद्धव ठाकरे,शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठीशी, राऊतांचा गौप्सस्फोट !

News Desk

..तर Aditya Thackeray यांना महाराष्ट्रात फिरण्याचा हक्क नाही- दीपक केसरकर

News Desk