आज मंगळवारी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात 16 राज्यातून एकूण 58 नवे खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा समावेश आहे.राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रातून नियुक्त करण्यात आलेल्या 6 राज्यसभा खासदारांना आज शपथ देण्यात आली. या ६ खासदारांपैकी ३ जणांची नावे खूप चर्चेत राहिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरआणि शिवसेनेचे खासदार अनिल देसाईं यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात एंट्री केलीये. या तिघांशिवाय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते वी. मुरलीधरन, राष्ट्रवादी काँग्रेसनं वंदना चव्हाण यांनीही खासदार पदासाठी शपथ ग्रहण केली. तर आता नारायण राणे आणि कुमार केतकर यांच्या राज्यसभेतल्या एंट्रीनं आता संजय राऊत, कुमार केतकर आणि नारायण राणे अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.