HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना ! मोठा निर्णय होणार ?

प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्रीपद, त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेला खुलासा आणि त्यानंतर मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार असल्याचा कयास होता. मात्र, प्रीतम मुंडेंऐवजी डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला. मात्र, कालपासून पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामे दिल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.

#pankajamunde #pritammunde #jpnadda #narendramodi #bjp #devendrafadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठीत बोलण्यास नकार ! ‘त्या’ लेखिकेच्या आंदोलनानंतर ‘मनसे’ आक्रमक, नेमकं प्रकरण काय ?

News Desk

Raju Parulekar Show EP 08 | डॉ. शीतल आमटे : आत्महत्येकडे पाहताना… | Dr Sheetal Amte | Suicide

News Desk

जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा ? नेमकं काय घडलं ?

News Desk