कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तब्बल ९ महिन्यांपासून राज्यातील मंदिरे, तसेच सर्वच प्रार्थना स्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने आजपासून (१६ नोव्हेंबर) अखेर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे, सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे अटी-नियमांचे पालन करून धर्मिकस्थळे खुली राहणार आहेत.
#UddhavThackeray #Temple #Maharashtra #Covid19 #Unlock