राज्यसभेत पेगॅसस तसंच १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार गोंधळ झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सरकारने केला .वेलमध्ये उतरुन आंदोलन करणाऱ्या महिला खासदारांनी निषेध व्यक्त करत कागद फाडले. विरोधकांनी सभागृहातील मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप सरकारने केला. तर विरोधकांकडून मार्शल्सकडून गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला खासदारांसोबत धक्काबुकी आणि अपमान केला गेला असा आरोप विरोधी पक्षाने केला. महिला कर्मचाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी महिला खासदारांवर हल्ला झाल्याने नाराजी व्यक्त केली.
#SharadPawar #RajyaSabha #RahulGandhi #CCTVFootage #NCP #LokSabha #Marshalls #Opposition #BJP #ModiGovt
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.