HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 06 | विवेकाचा धर्म | France Terror Attack | #Religion

कोणत्याही धर्माचा प्रेषित हा आपल्या अनुयायांना हिंसेची शिकवण देत नाही. सगळ्या धर्मांमध्ये उदारमतवादी आहेत आणि सगळ्याच धर्मांमध्ये कट्टरवादी देखील आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्माने आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांचा अभिमान बाळगण्यासोबतच आपल्या धर्मातील कट्टरवाद्यांना आवरायला शिकायला हवं. दुसरा धर्म असहिष्णू आहे म्हणून आमचा धर्म असहिष्णू झाला अशी प्रत्येक धर्माची तक्रार असते. ज्यात काही अंशी तथ्यही आहे. धर्मा-धर्मांत निर्माण होणाऱ्या कट्टरतेमुळे राजकीय ध्रुवीकरणाची समीकरण बनत जातात. धर्म हे मुळातच माणसाला उन्नत करण्यासाठी बनले आहेत. आणि धर्म संघटना याच धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपाताचं मूळ आहेत. खरंतर एकमेकांना दगडाने ठेचून मारण्याची अश्मयुगीन संकल्पना मागे टाकण्यासाठी आपण धर्माची, मूल्यांची स्थापन केली. मात्र, परत त्याचं एक संघटन तयार करून आपण मानसिकरित्या एका गुहेत जातो. कळप निर्माण करतो. हे कळप आपापसात एकमेकांना भिडतात तेव्हा ती कोणाची तरी राजकीय सोय होते. जगातील सद्यस्थितीत या पार्श्वभूमीवर नेमकी कोणाची बाजू घ्यावी ? असा प्रश्न कोणत्याही विवेकवादी माणसाला पडेल. त्यामुळे, त्या त्या वेळी जिथे विवेक आणि मुक्तपणा दिसतो त्याच्या बाजूने आपण उभं राहायला हवं.

#RajuParulekarShow #France #FranceTerrorAttack #Religion #India #FightAgainstTerrorism

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना मुक गिळून गप्प का ? शरजील उस्मानीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक !

News Desk

BJP नेत्यांवर ‘ED’, ‘CBI’ची कारवाई झाल्याचं दाखवा अन् लाखोंचं बक्षीस मिळावा

Manasi Devkar

आमचं गाव हरवलयं

News Desk