HW News Marathi
व्हिडीओ

रुपयाचे मूल्य आणखी घसरणार?

मुंबई | दिवसेंदिवस रुपयाचे मुल्य घसरत असल्यामुळे जर तुम्ही चिंतेत असाल तर तुमच्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. सध्या भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरीकन डॉलरची किंमत ७२ रुपयांवर जाऊन पोहचली आहे. यामुळे फार विचलीत होण्याची गरज नाहीये, कारण खुद्द महाराष्ट्र सरकार देखील भविष्यात रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण होणार असल्याचे ग्राह्य धरुन व्यवहार करताना पहायला मिळत आहे. हे आम्ही नाही तर महाराष्ट्र शासनाने मंगळवारी काढलेल्या एका जी आर मध्ये नमूद करण्यात आले आहे

महाराष्ट्र सरकारने राज्यातील अतीमहत्वाच्या विषेश व्यक्तींसाठी नविन हेलिकॉप्टर्स खरेदीचा घाट घातला आहे. हे हेलिकॉप्टर्स अमेरीकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल ऑपरेशन या कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदी करता राज्यसरकारने मे महिन्यात टेंडर देखील काढले होते. या टेंडरमध्ये १ डॉलरला ७० रुपयांप्रमाणे मुल्य देऊन सुमारे १२७.११ करोड रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र सध्या महाराष्ट्र सरकारने ११ सप्टेंबर २०१८ ला जारी केलेल्या एका शुद्धीपत्रकात डॉलरचे मुल्य ८० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी सरकारने १४५.२७ करोड रुपयांना मंजूरी दिल्याचे पहायला मिळत आहे.

सध्या केंद्रसरकार घसाफोडून सांगत आहे रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत यापेक्षा घसरणार नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार असतानाही भविष्यात डॉलरचे मुल्य घसरेल हा विचार करुन जर व्यवहार होत असेल, राज्य सरकार केंद्र सरकारवर विश्वास ठेवत नसेल तर जनतेचे काय हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rafale Deal | अजून एक खुलासा, संरक्षण मंत्रालय मोदींवर नाराज !

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे ही गंमत आहे का ? पवारांनी नवनित राणा आणि विरोधकांना सुनावलं !

News Desk

भाजपसोडून पंकजांना कोणीही सहन करणार नाही !, मेटे-मुंडेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

News Desk