HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut And Devendra Fadnavis | सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं..महाराष्ट्राचं ग्रहण सुटेल..

राज्यातील सत्तास्थापनेबाबत तिढा वाढत चालला असून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असं ठामपणे सांगितले आहे. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं ही शिवसेनेची भूमिका आहे. लवकरच उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात स्थिर सरकार यावं ही सगळ्यांची भूमिका आहे. राज्यपालांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. काय होऊ शकते शिवसेनेची भूमिका काय याची माहिती राज्यपालांना दिली. अपक्षांची भूमिका महत्वाची आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे. शरद पवार देशाचे मोठे नेते, ते मुख्यमंत्री होतील ही अफवा आहे असं त्यांनी सांगितले.#SanjayRaut #shivsena #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut हा फाटक्या तोंडाचा आहे : आमदार संजय गायकवाड

News Desk

शिंदे-भाजपचा विरोध Uddhav Thackeray यांना की उर्दूला?

Manasi Devkar

Milind Deora | मुंबईकरांनी प्रॉपर्टी टॅक्स भरू नये !

swarit