HW News Marathi
राजकारण

राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद सोशल मीडियावर

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटून गेले असले तरी अद्याप राज्यात नवे सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील जनतेने भाजप-महायुतीच्या बाजूने कौल दिला. मात्र, मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला या दोन मुद्द्यांवरून या दोन्ही पक्षांमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरु आहे. संपूर्ण राज्याला आता आपला मुख्यमंत्री कोण होणार ? हा प्रश्न पडला आहे. दरम्यान, राज्यातील हा सत्तास्थापनेसंदर्भातील संघर्ष आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्याचप्रमाणे त्यांच्या समर्थनार्थ असे ट्रेंड्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. #RejectFadnavisForCM, #RejectFadnavisAsCM याचसोबत #MaharashtraNeedsDevendra असे दोन्ही प्रकारचे ट्रेंड्स सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत सुरु झालेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असेही समीकरण राज्यात बनू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “आपणच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार” असा स्पष्ट दावा करत असताना दुसरीकडे शिवसेना देखील मुख्यमंत्रीपदावर तीव्रपणे असून राहिल्याचे पाहायला मिळात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील हा सत्तासंघर्ष आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळाला. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही मतप्रवाह सध्या पाहायला मिळत आहेत. एकीकडे #RejectFadnavisForCM, #RejectFadnavisAsCM असे फडणवीस यांच्याविरोधातले ट्रेंड्स सुरु असताना दुसरीकडे #MaharashtraNeedsDevendra सारखा ट्रेंड देखील ट्विटरवर पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार जर या देशाचे पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील !

News Desk

पंतप्रधान मोदींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे !

News Desk

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?

News Desk