HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut And Sharad Pawar | पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात..’मुख्यमंत्री शिवसेनेचाचं’

शिवसेनेनं ठरवलं तर आवश्यक ते बहुमत सिद्ध करु शकतो, असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आज पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच ते म्हणाले की, महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते. संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आमचा भाजपसोबत सत्तेच्या वाटपाबाबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. संपूर्ण राज्यासमोर, माध्यमांसमोर आम्ही दोन्ही पक्षांनी सत्तेच्या समसमान वाटपाबाबतचा फॉर्म्युला मान्य केला आहे. जर समोरचा पक्ष त्या फॉर्म्युलाचे पालन करत नसेल तर आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत. भाजपने ठरलेल्या फॉर्म्युलाचे पालन करुन, सत्तास्थापन करावी.. संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल (31 ऑक्टोबर) एक गुप्त बैठक झाली होती. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारले असता, राऊत म्हणाले की, शरद पवारांना भेटण्यात गैर काय आहे? मला त्यात काहीही गैर वाटत नाही.. #SanjayRaut #Shivsena #Samana #SharadPawar #NCP #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil BJP | ‘हे’ सरकार पाडण्यासाठी बाहेरून प्रयत्न करण्याची गरजच नाही !

Gauri Tilekar

Jalgaon। भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk