HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-BJP alliance | किरीट सोमैयांवर शिवसेनेची नाराजी !

शिवसेना – भाजप युती होत असताना ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना लोकसभेची तिकीट देऊ नये अशी अट शिवसेनेनं भाजप नेतृत्वापुढे ठेवली. त्याची कुणकुण लागताच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यामुळ लोकसभा निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होणार की काय?अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी थेट मातोश्रीवर हल्ला चढवला होता. त्यामुळे शिवसैनिकांचा प्रचंड राग हा खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी देखील किरीट सोमय्यांना तिकीट दिल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या साऱ्याचा फटका किरीट सोमय्यांना बसण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Coronavirus In Maharashtra | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ वर

swarit

गांधी जयंती दिनी सरकारचा गांधीगिरीने निषेध – जुन्या पेन्शन योजनेची मागणी

News Desk

राष्ट्रवादीत खडसेंच्या राजकीय भवितव्याचं काय ? खडसेंनी भाजपला का दिलाय इशारा ?

News Desk