HW News Marathi
व्हिडीओ

फाटली म्हणून माघार घेतली!; ShivSena ने राणांना डिवचलं

“राज्यात पोलिसांना, सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे. मात्र हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दांपत्यावर निशाणा साधलाय. “याला त्यांनी आंदोलन म्हटलंय. आम्ही मुळात आंदोलन म्हणतच नाही. आमचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे, बाळासाहेब, मातोश्री, सेना भवन, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि मुंबईतील लोकांना एक आदरभाव आणि श्रद्धाभाव आहे. जर तुम्ही थेट आमच्या मातोश्रीला आव्हान देणार. थेट येऊन वाचूनच दाखवणार असं म्हणत असाल तर तुम्ही आहात कोण?,” असा टोला महापौर पेडणेकर यांनी लगावला. “आम्हाला कळलंय तुमची २०२४ ची तयारी चाललीय. आता पवारांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार नाहीय. निवडून तर यायचं आहे. नौटंकी करुनच निवडून यायचं आहे. यांच्या सगळ्या नौटंक्या सुरु राहणार,” असंही त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

#KishoriPednekar #VarunSardesai #RahulKanal #ManishaKayande #SanjayRaut #RaviRana #NavneetRana #Matoshree #ShivSena #BJP #HanumanChalisa #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Shivsena च्या राठोडांचा राजीनामा घेतला ना? मग मलिकांचा का नाही?”; Sudhir Mungantiwar यांचा सवाल

News Desk

लढाई निष्ठेची; दसरा मेळाव्यासाठी Shivaji Park वर शिवसैनिकांची गरदी

Chetan Kirdat

शरद पवारांच्या पावसातल्या सभेची द्विवर्षपूर्ती! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

News Desk