बीडमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालीय. आज बीडमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. “स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर हे आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत” असल्याचा आरोपही यावेळी शिवसैनिकांनी केला. याच मुद्यावरून शिवसैनिक आज बीडमध्ये रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून “अजितदादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा” असं म्हणत चक्क बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आलीय. नेमकं बीडमध्ये काय घडतंय? जाणून घेऊया.
#AjitPawar #DhananjayMunde #UddhavThackeray #SharadPawar #BeedPolitics #ShivsenaNCP #MaharashtraPolitics #SenaNCP #SandeepKshirsagar #Beed
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.