HW News Marathi
व्हिडीओ

“Thackeray’ टॅक्स-फ्री नव्हता, मग “Kashmir Files’ का?” राऊतांचा फडणवीसांना सवाल

द काश्मीर फाइल्स या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण काही थांबायला तयार नाही. हा चित्रपट टॅक्स-फ्री करा म्हणणारे भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली होती. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीही काश्मीर फाइलवरून भाजपला घेरले आहे.

#SanjayRaut #Shivsena #Thackeray #TheKashmirFiles #KashmiriPandits #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #KashmirFiles

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ही’ ShivSena ची संस्कृतीच; Sunil Raut यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर BJP नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

अंधारेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राणेंवर हल्लाबोल

News Desk

Central Government विरुद्ध State Government वादात यंत्रणांचा नाहक बळी जातोय का ?

News Desk