HW News Marathi
व्हिडीओ

केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, परंतु काळजी घेणे अवश्य

डॉक्टर म्हणजे देव असे म्हटले जाते. मृत्यूच्या दारातून रुग्णाची सुटका ते करतात. कधी कधी रुग्णासाठी ते अनेक गोष्टींचा त्याग करतात आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण करतात. केरळमध्ये अशीच एक घटना घडली. केरळच्या कोझिकोड येथे निपाह व्हायरस पीडित रुग्णांची सेवा करताना नर्स लिनी यांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे आपले कर्तव्य पार पाडताना तिला आपल्या कुटुंबियांना भेटता आले नाही. तिने कुटुंबावरील प्रेमाखातर त्यांना भेटण्याचा मोह आवरला अन्‌ शेवटी कर्तव्य बजावत असतानाच तिने आपले प्राण सोडले.

निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत १० जणांना जीव गमवावा लागला, तर आणखी २५ जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचे निष्पन्न झाले. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो,असे केरळ आरोग्य विभागाने राज्यभर हाय अलर्ट म्हणून घोषित केलं आहे. या व्हायरसने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेक जणांवर उपचारहि सुरू आहेत . चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नसल्याची शक्यता सध्या दर्शविली आहे.आता हा ‘निपाह’ विषाणू म्हणजे काय?

१. निपाह व्हायरस (NiV) हा वेगाने पसरतो, जो जनावरं आणि मानवावर वेगाने हल्ला करून गंभीर आजाराला जन्म देतो.

२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, 1998 मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता ३. सुरुवातीला डुकरांना लागण झाली आणि नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये हा विषाणू पसरला 4. बांग्लादेश आणि मलेशियात या विषाणूचे प्रमाण जास्त

दरम्यान, सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी केरळला डॉक्टरांचे पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळे खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणेही गरजेचे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज” – सत्यजीत तांबे

Manasi Devkar

मृत तरुणीला न्याय देण्यासाठी Ram Kadam यांनी घेतली वरिष्ठांची भेट

Seema Adhe

Uddhav Thackeray Shivsena | मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

Gauri Tilekar