HW News Marathi
व्हिडीओ

‘मेगाभरती’नंतर आता भाजपमध्ये ‘मेगा गळती’? राष्ट्रवादीसह शिवसेनाही करतंय भाजपची कोंडी

मिरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. मिरा भाईंदरची जबाबदारी भाजप आपल्या हातात देईल, असा विश्वास गीता जैन यांना होता. मात्र, भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. बदलत्या राजकीय परिस्थितीत गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास सत्तेचं पारडं उलटं फिरण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना आपल्याकडे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची कोंडी करत असताना दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपची कोंडी होत आहे. गेल्याच वर्षी ज्या पक्षात मेगाभरती झाली त्याच पक्षात आता मेगागळती सुरु झाली का ? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
#SharadPawar #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra #Mumbai #GeetaJain #EknathKhadse #JayantPatil #EknathShinde #Shivsena #NCP #Congress
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर सांगलीत चंद्रकांत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला नसता !

News Desk

Udayanraje Bhosle BJP | भाजप देणार उदयनराजेंना ‘हे’ गिफ्ट….

Arati More

Cancer च्या पेशींचा नाश करण्यासाठी ५५० कोटींचं मशीन; मात्र उपचार मिळणार मोफत

News Desk