HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle,Sharad Pawar | मी अडचणीत होतो,तेव्हा पवार कुठे होते? उदयनराजेंचा सवाल!

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना उदयनराजेंना ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत असं विधान केले होते. पाटील यांच्या या विधानाला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मला प्रवेश करायचा असला तर मी पुढाकार घेईन असं विधान केले आहे.याविषयी बोलताना उदयनराजे यांनी ‘कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, मी कधीही नकारात्मक विचार करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी कायम सकारात्मक विचार करतो असं विधान करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यामुळे उदयनराजे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.पुढे बोलताना उदयनराजे यांनी ‘लोकांच्या कल्याणासाठी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतलाय. कोणत्या पक्षात जायचं की नाही ते नंतर पाहू. पण गेल्या एवढ्या वर्षापासून मी जेवढ्या योजना आणल्या, त्याला कुणीही साथ दिली नाही. मग अशा लोकांबरोबर कशाला रहायचं असं म्हणत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.शरद पवार अडचणीत असताना अनेक लोक पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला असता ,मी अडणीत होतो तेव्हा कोणीचं नव्हत,असे म्हणत पवारांना टोला लगावला आहे. #UdayanrajeBhosle #SharadPawar #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra पेटेल अशी वक्तव्य करू नका; Jitendra Awhad यांची हात जोडून विनंती

News Desk

Sanjay Raut | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

swarit

मुख्यमंत्र्यांच्या Aurangabad च्या सभेबाबत Chandrakant Khaire यांचं मोठं विधान

News Desk