HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे-मोदी एकांतात भेटले ! उद्धव ठाकरे म्हणतात…आमचं नातं तुटलेले नाही

मराठा आरक्षणासह राज्‍यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान, या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोंदीची वैयक्तिक भेट घेतली असल्याचे समोर आले. पंतप्रधानांसोबत ठाकरेंची ३० मिनिटं वैयक्तिक चर्चा झाली असल्याची माहिती देखील समोर आली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे पूर्वीपासून मैत्रीचे नातं आहे. सत्तेच एकत्र नाही याचा अर्थ आमचं नात तुटलं असे होत नाही. असे सांगत मी त्यांची व्यक्तिगत भेट घेतल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत भेट घेतल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

#uddhavthackeray #narendramodi #ajitpawar #marathareservation #maharashtra #bjp #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घोटाळ्याच्या मुद्द्यावरून Somaiya आणि Raut पुन्हा एकदा आमने-सामने

News Desk

पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन…! नेमकं काय झालं?

News Desk

राज्यात पुन्हा लॅाकडाऊन? पुढच्या २ दिवसांत होणार निर्णय!

News Desk