HW Marathi
व्हिडीओ

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार,लोकलबाबतही ‘हा’निर्णय!

दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा जीआर आज काढण्यात येणार आहे. मात्र, ज्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.

#Uddhavthackeray #Corona #Lockdown #Unlock #Hwnewsmarathi #Sangli #Maharashtra #Covid19 #Coronavirus

Related posts

राणेंची ‘एंट्री’ आणि जावडेकरांच्या ‘एक्झिट’मागे भाजपची नेमकी राजकीय रणनीती काय?

News Desk

अधिवेशन,निवडणुका होतात मग MPSC परीक्षा का नाही? ठाकरे सरकारचा सर्वस्तरांतून निषेध!

News Desk

MahavikasAaghadi Karjmafi | सरकारने केलेल्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांनी पेढे वाटून केले स्वागत..

Arati More