HW Marathi
व्हिडीओ

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे


शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देत छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिराचा परिसर आज दणाणून सोडला. रविंद्र नाट्य मंदीर येथे आज १०वी, १२वीसाठीची करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. याच उदघाटनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. त्यावेळी एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढालेंसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

#VinodTawde #mumbai #ChhatraBharati #10thsscresult2019

Related posts

NCP- Udayan Raje & Shivendra Raje Bhosale | राजेंच मनोमिलन, ‘उदयनराजेंना’ साताऱ्यातून उमेदवारी ?

News Desk

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk

Sujay Vikhe vs Sharad Pawar | मला दिलेला त्रास व्याजासह परत करणार, सुजय विखेंचा राष्ट्रवादीला इशारा

Arati More