HW News Marathi
व्हिडीओ

२००४ साली सचिन वाझेंचं निलंबन झालेलं ‘ते’ प्रकरण नेमकं कोणतं ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या पार्श्वभूमिवर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक करत या प्रकरणी १० दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे.या पार्श्वभूमीवर एकीकडे वाझेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मोठ्या अडचणीत सापडलेल्या वाझेंचे आता पुन्हा एकदा निलंबन झालेले आहे. मात्र यापूर्वीही २००४ साली एका प्रकरणामुळे वाझेंवर हीच निलंबनाची नामुष्की ओढवली होती. त्याबाबत आज आपण पाहणार आहोत.

#SachinVaze #AntiliaCase #KhwajaYunusCustodialDeathCase #MukeshAmbani #MansukhHiren #Maharashtra #UddhavThackeray #SharadPawar #NCP #MVA #MahaVikasAaghadi #GhatkoparBlast

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Madha- Atul Khupse vs Sanjay Shinde | माढ्यामध्ये राजकीय वैमनस्यातून जाळपोळ आणि मारहाण ?

Arati More

आधी दुष्काळ, आता ढगफुटी! Marathwada मधील शेतकऱ्याच्या मरणयातना…

News Desk

शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत Raj Thackeray यांचं पत्र

Seema Adhe