HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादी ‘ही’ निवडणुक लढणार नव्या मित्र पक्षासोबत…

2022 हे वर्ष राजकारणातलं अत्यंत महत्त्वपूर्ण वर्ष मानल जातय कारण महाराष्ट्रात महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत, आणि दुसरीकडे देशात उत्तर प्रदेश गोवा गुजरात यासारख्या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका देखील 2022 मध्येच होणार आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आता हा विडा उचलला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. तर उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातल्या भाजपा सरकारला हाणून पाडण्यासाठी विरोधी पक्षाकडून आता रणनीती आखण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे .मात्र विरोधक एकत्र आले तर योगी आदित्यनाथ यांची डोकेदुखी मात्र वाढू शकते.

#SharadPawar #AkhileshYadav #UttarPradesh #NCP #BJP #Samajwadi #Maharashtra #Hwnewsmarathi #Yogiadityanath

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk

Ed Notice म्हणजे प्रेमपत्र,Sanjay Raut यांनी साधला BJP वर निशाणा! fadnavis काय म्हणाले?

News Desk

“मी पुन्हा येईन” म्हणणाऱ्या फडणवीसांना जनता चपलेने मारेल! ; काँग्रेसचे Bhai Jagtap अक्रमक

News Desk