HW News Marathi
व्हिडीओ

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणूक जवळ आलेल्या असताना आता इथलं राजकीय वातावरण पेटायला सुरुवात झालीये. महापालिका निवडणुका आल्या आणि औरंगाबादचं संभाजीनगर करा, अशी मागणी झाली नाही तर आश्चर्यच. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना, भाजप आणि मनसे हे तिन्ही पक्ष औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेत. तर सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेसने याविषयी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव मार्च 2020 मध्येच पाठवला होता. मात्र आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यावर पुन्हा सुरू झाली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा एकदा शिवसेनेची लगबग सुरु झालेली असताना काँग्रेसने याला केलेला तीव्र विरोध हे शिवसेनेपुढे मोठे आव्हान आहे. शिवसेनेला हे आव्हान पेलणार का ?

#UddhavThackeray #BalasahebThorat #Aurangabad #SambhajiNagar #DevendraFadnavis #BJP #AurangabadMunicipalElection #AurangabadElection #AurangabadMunicipalCorporation #ChandrakantKhaire #Shivsena #Congress #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

swarit

Rupali Chakankar On Women Safety | महिला अत्याचाराला पाठबळ देणार भाजप सरकार !

Gauri Tilekar

“कुणाची हिंमत नाही…”, मुंबईला केंद्रशासित करण्याच्या मुद्यावर Aditya Thackeray आक्रमक

News Desk