HW News Marathi
राजकारण

अलविदा रॉकी ! ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानाचे निधन

बीड | उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक पदकांचा मानकरी आणि खुन, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा तपास रॉकी या श्वानाने केला. पण, आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी खांदा दिला आणि त्याला अखे
रचा निरोप देताना भावूक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पानावल्या.

नऊ वर्ष आयुष्य जगलेल्याला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचं जाणं पोलिस दलासाठी जेवढ वेदनादायी तेवढं त्याच्यासाठी अभिमानाच ठरलं. ज्याच्यासाठी हवेत बंदूकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली गेली.

१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधीत्व केले. २०१६ साली म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली.

जिल्हयातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृती बाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भुमिका आहे. दरम्यान, १७ जूलै पासून आजारी असलेल्या रॉकीचे १५ ऑगस्टला पहाटे निधन झाले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही रॉकीला श्रद्धांजली वाहिली आहे.”आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा खुलासा

Gauri Tilekar

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

News Desk

आम्ही अजित पवारांच्या पाठीशी खंभीरपणे उभे होते !

News Desk