HW News Marathi
राजकारण

जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविरुद्ध संजय राऊत बोलले तर वादळचं आलं

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन डॉक्टरांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर या वक्तव्यावरुन विरोधकांनी संजय राऊत यांना लक्ष्य करत टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, या प्रकरणावर संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

यांवर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड संजय राऊत यांच्या मदतीला धावून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेबद्दल केलेल्या विधानावरून राऊत यांच्यावर होत असलेल्या टीकेवरुन जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले आहे.जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून राऊतांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. “जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेलं नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आलं,” अशा शब्दांत आव्हाड यांनी टीकाकारांना सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलविदा रॉकी ! ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानाचे निधन

swarit

“राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल,” फडणवीसांचा पुन्हा एकदा दावा

Aprna

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

News Desk