HW News Marathi
राजकारण

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही – गिरीश बापट

पुणे |उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशातच पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

“पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे हा घरातला. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा” असे गिरीश बापट म्हणाले. पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, ‘जय श्रीराम’ एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असेही बापट म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

“पार्थ पवार अपरिपक्व. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही”, असे म्हणत शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांत राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि शरद पवारांविरोधात अशी एक वेगळी भूमिका घेताना दिसून आले. राजकीय वर्तुळात याच पार्श्वभूमीवर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

News Desk

अरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा

News Desk

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

swarit