HW News Marathi
राजकारण

भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्तेपदाची जबाबदारी

मुंबई | भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील प्रवक्तेपदाची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्यावर सोपविली आहे. पडळकर हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने मोठा गदारोळ उडाला होता. यावर पक्षाच्या नेत्यांची सावरासावर करताना दमछाक झाली आहे. आता आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या पडळकरांनाच भाजपने प्रवक्ता नेमून पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या काळासाठी पक्षाचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज (१७ ऑगस्ट) १० प्रवक्ते व ३३ चर्चा प्रतिनिधींची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये असून, उत्तर महाराष्ट्राची प्रवक्तेपदाची जबाबदारी खासदार भारती पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबईत राम कदम, भालचंद्र शिरसाट आणि राहुल नार्वेकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विदर्भातील प्रवक्तेपदाची जबाबदारी शिवराय कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भाजपचे प्रवक्ते आणि चर्चा प्रतिनिधी खालीलप्रमाणे : 

मुख्य प्रवक्ता – केशव उपाध्ये 

प्रवक्ते –

खासदार भारती पवार, उत्तर महाराष्ट्र 

आ‍मदार गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र 

आमदार राम कदम, मुंबई 

शिवराय कुलकर्णी, विदर्भ

एजाज देखमुख, मराठवाडा 

भालचंद्र शिरसाट, मुंबई 

धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र 

राम कुलकर्णी, मराठवाडा 

श्वेता शालिनी, पुणे 

अॅड. राहुल नार्वेकर,  मुंबई

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंसह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांनी घेतले ताब्यात

Aprna

बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही !

News Desk

बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा ?

News Desk