HW News Marathi
Covid-19

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. “कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अशा अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली. काही जण बरे होऊन घरी गेले तर काहींनी जीव गमावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

News Desk

कोरोना नियंत्रणात, निर्बंधांचं काय?, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार आढळला!

News Desk