HW News Marathi
राजकारण

विनोद तावडेंना तिकीट मिळू नये हा नियतीचा अजब खेळ !

मुंबई । आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच भाजपच्या चौथ्या उमेदवार यादीतही विनोद तावडे यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांना टोला लगावला आहे. “मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे”, असे टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

“काँग्रसचे पानिपत झाल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये”, असा सल्ला विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे. हाच धागा पकडत अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांच्यावर पलटवार केला आहे. “मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे”, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

विनोद तावडे काय म्हणाले होते ?

“झाकली मूठ सव्वा लाखाची समजून निवडणुकीला सामोरे जाऊ नये. मी मित्र या नात्याने अशोक चव्हाण यांना सल्ला देत आहे. भोकरच काय, तर अशोक चव्हाण राज्यातील २८८ पैकी कुठेही उभे राहिले तरी ते पराभूत होतील”, असा दावा देखील तावडे यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RafaleDeal : संसदेत ‘कॅग’चा अहवाल सादर, विरोधकांची जोरदार प्रदर्शने

News Desk

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

News Desk

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk