HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काश्मीरमधील ३ फुटीरवादी नेत्यांना १० दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू-काश्मीर | काश्मीर खोऱ्यातील दगडफेक आणि प्रक्षोभक भाषणांप्रकरणी फुटीरतावादी नेता मसरत आलम भट, शब्बीर शाह व आसिया अंद्राबी यांना चौकशीसाठी १५ दिवसांसाठी ताब्यात घेण्याची मागणी मंगळवारी (४ मे) दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयात एनआयएकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाकडून या तिन्ही फुटीरवादी नेत्यांना १० दिवसांसाठी एनआयएकडे सोपवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीत काही जवानांचा मृत्यू देखील झाला होता. २०१५ साली मसरत आलम भट याला अटक करण्यात आली होती.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार राणेंचा सहभाग

News Desk

गेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत !

Gauri Tilekar

हिंदु महासभेचा कुमार स्वामींच्या शपथविधीला विरोध

News Desk