HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#21daysLockdown | देशातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | देशात मोठ्या प्रमाणात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज (२४ मार्च) मध्यरात्रीपासून संपूर्ण भारत लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली आहे. पुढचे तब्बल २१ दिवस संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदींनी या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण सूचना, तसेच काही घोषणा केल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. देशभरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्राने या निधीची घोषणा केली आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या या निधीतून चाचणी सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल. त्याचप्रमाणे वैयक्तिक सेवेशी संबंधित उपकरणे, आयसोलेशन वॉर्ड्स, आयसीयू बेड्स यांसह अन्य अत्यावश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देता येईल, अशीही आशा देखील पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५०० पार तर राज्यातील आकडा १०० पार गेलेला असताना सरकारला कडक पावले उचलणे अत्यंत आवश्यक बनले आहे. सरकारकडून वारंवार सूचना आणि आवाहने केली जात असताना देखील काही नागरिक क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून आता सरकारला संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

पुढच्या २१ दिवसांत जर ‘कोरोना’ व्हायरस नष्ट होऊ शकला नाही तर मोठी हानी होऊ शकते अशी भीती देखील यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. मात्र, असे असले तरीही या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी दिली आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार असे दोघेही तत्परतेने काम करत आहेत. नागरिकांची कोणत्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये, यासाठी दोन्ही सरकार प्रयत्नशील आहेत. सर्व अत्यावश्यक सोयी-सुविधा नागरिकांसाठी योग्य वेळी उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे”, असेही पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणात स्पष्ट केले आहे.

Related posts

राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढणार ?

News Desk

शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटून ९ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

News Desk