HW News Marathi
राजकारण

२३ मे हा दिवस ‘मोदी दिन’ म्हणून साजरा व्हावा !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. “भाजपने २३ मे रोजी ऐतिहासिक विजय मिळवला. २३ मे हा दिवस ‘मोदी दिन’ किंवा ‘लोक कल्याण दिन’ म्हणून साजरा व्हावा”, अशी मागणी योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेव बाब यांनी ही मागणी केली आहे.

“एका बाजूला विरोधकांची महाआघाडी होती, तर दुसऱ्या बाजूल एकटे मोदी. त्यांनी निवडणुकीमध्ये चांगली लढत दिली आणि विक्रमी जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशमध्येही त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. आता देशातील नागरिक त्यांच्या हाताखाली सुरक्षित आहेत. भाजपने 23 मे रोजी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे हा दिवस ‘मोदी दिवस’ किंवा ‘लोककल्याण दिवस’ म्हणून साजरा व्हावा”, असे रामदेव बाबा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त | ममता बॅनर्जी

News Desk

बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा! – शंभूराज देसाई

News Desk

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna