HW News Marathi
राजकारण

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले ‘ते’ ६ मंत्री नाराज ?

मुंबई | बहुचर्चित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (१६ जून) पार पडला आहे. या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या १३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर रविवारी रात्री उशिरा या सर्व मंत्र्यांची खाती देखील जाहीर झाली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेल्या ज्या ६ मंत्र्यांमध्ये मात्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (१७ जून) सुरु झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले हे ६ मंत्री आज सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनुपस्थित राहिल्याची माहिती मिळत आहे. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ६ मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. त्याचप्रमाणे “अकार्यक्षम म्हणून मंत्रिमंडळातून कोणाला वगळण्यात आलेले नाही. मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची होती”, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले मंत्री

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग आणि खणीकर्म, पर्यावरण तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा समावेश आहे.

१३ नवे मंत्री आणि खाती

कॅबिनेट मंत्री

  • राधाकृष्ण विखे पाटील – गृहनिर्माण खाते
  • आशिष शेलार – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – रोजगार हमी व फलोत्पादन
  • तानाजी सावंत (शिवसेना) – जलसंधारण
  • संजय कुटे – कामगार, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
  • सुरेश खाडे – सामाजिक व विशेष सहाय्य मंत्री खाते
  • डॉ. अनिल बोंडे – कृषी
  • डॉ. अशोक उईके – आदिवासी विकास खाते

राजमंत्री

  • योगेश सागर – नगरविकास खाते
  • अतुल सावे – उद्योग आणि खणीकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ
  • संजय उर्फ बाळा भेगडे – कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
  • परिणय फुके – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) वने, आदिवासी विकास
  • अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते !

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk

…मग काँग्रेसला महाआघाडी करण्याची गरज का पडते ?

News Desk