HW News Marathi
राजकारण

देशभरात पाचव्या टप्प्यात ६३.५० टक्के मतदान

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान काल (६ मे) पार पडले आहे. पाचव्या टप्प्यात ७ राज्यांतील ५१ मतदारसंघांत सरासरी ६३.५० टक्के मतदान झाले. याआधीच्या चार टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यांच्या मतदानात घट झालेली पाहायला मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसाचाराचे सत्र कायम सुरु असतानाही ७४.४२ टक्के मतदान झाले. कश्मीर खोऱ्यात पुलवामा, शोपियाँ येथे दहशतवाद्यांनी मतदान केंद्रांवर ग्रेनाइड हल्ला आणि दगडफेक केली. याचा परिणाम मतदानावर पडलेले दिसून आला आहे. काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ३ टक्के मतदान झाले आहे. १२ मे आणि १६ मे रोजी मतदानाचे आता दोनच टप्पे राहिले आहे.

बिहारमध्ये ईव्हीएम फोडल्याने गोंधळ

बिहारमध्ये सारण लोकसभा मतदारसंघांतर्गत नयागावातील १३१ नंबर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडण्यात आल्यानेे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे. सारण या मतदारसंघातून लालू प्रसाद यादव यांचे नातेवाईक चंद्रिका राय महाआघाडीचे उमेदवार आहेत, तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी रिंगणात आहेत.

स्मृती इराणींकडून ‘बूथ कॅप्चरिंग’चा आरोप

एका वृद्ध महिलेला ‘भाजप’ला मतदान करायचे होते. परंतु बळजबरीने तिचे बोट ‘पंजा’वर दाबले. राहुल गांधींकडून ‘बूथ कॅप्चरिंग’ केले जात असल्याचे ट्विट करीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. परंतु निवडणूक आयोगाने या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

पाच टप्प्यांची टक्केवारी

पाचव्या टप्प्यात सरासरी ६३.५० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पहिल्या चार टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यात मतदानात घट झाली. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ६९.५० टक्के, दुसरा ६९.४४ टक्के, तिसऱ्या ६८.४० टक्के तर चौथ्या टप्प्यात ६५.५१ टक्के मतदान झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामा हल्ल्याबाबत यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण !

News Desk

“पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत SRAमध्ये सदनिका मिळविली”, सोमय्यांचा आरोप

Aprna

शिवसेना कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही !

News Desk