HW News Marathi
राजकारण

“पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत SRAमध्ये सदनिका मिळविली”, सोमय्यांचा आरोप

मुंबई | माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एसआरए घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. किशोरी पेडणेकरांनी मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत एसआरएमध्ये सदनिका मिळविल्याचा आरोप सोमय्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. आणि कोव्हिड काळात किशोरी पेडणेकरांना हा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सोमय्यांनी आज (30 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेतून किशोरी पेडणेकरांविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये कागदपत्रे त्यांनी जमा केली आहेत.

किरीट सोमय्या म्हटले, “गोमाता जनता एसआरए वरळी येथे सदनिका बळावण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी मूळ लाभार्थी संजय अंधारी यांच्या नावाने खोरी स्वाक्षरी करत खोटी कागदपत्रे सादर केली.” किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “एसआरए घोटाळ्यासंदर्भात वर्षभरापूर्वी तक्रार दाखल केली होती. परंतु, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे पेडणेकरांविरोधातील चौकशी झाली नाही. ठाकरे सरकारच्या काळात पेडणेकरांविरोधात पुरावे दिले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून दबाव आल्याने या घोटाळ्याची चौकशी झालेली नाही.”

दरम्यान, पेडणेकरांनी घोटाळ्यातून पैसे कमवून बेनामी मालमत्ता कमवल्याचा आरोपी सोमय्यांनी केला असून दिवंगत भावाच्या नावावर पेडणेकरांनी फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या घोटाळ्याची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून एसआरएने चौकशी सुरू केली आहे, असेही सोमय्यांनी सांगितले.

 

 

Related posts

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

News Desk

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna