HW News Marathi
राजकारण

राफेलबाबत मोदी सरकार देशभरात घेणार ७० पत्रकार परिषदा

नवी मुंबई | बहुचर्चित राफेल विमान खरेदी करारबाबत आपली भूमिका संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर भाजपच पारडे चांगलंच जड झाले. मात्र, तरीही आक्रमक होत राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भाजपवर पुन्हा टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद का घेतली नाही ? असा सवालही यावेळी पुन्हा एकदा राहुल गांधींनी उपस्थित केला होता.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून राफेलबाबत मौन बाळगणेच पसंत केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले मौन सोडले आहे. “काँग्रेसने आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवला आणि आता त्यांचा देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही”, असे पंतप्रधान मोदी रायबरेलीत बोलत होते.

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.

राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारवर वारंवार विविध आरोप केले होते. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला फसविल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब, भाजप नेत्याची जीभ घसरली

News Desk

सरकारविरोधात बोलल्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरेंचा भर कार्यक्रमात माईक केला बंद

Aprna

अकोल्याच्या जागेवरून युतीत तणाव निर्माण होणार ?

News Desk