मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात दापोलीतील कथित साई रिसॉर्ट (Dapoli Sai Resort) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीतील दापोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्य कलम 34 आणि 420 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यापूर्वी परबांच्या दापोलीच्या रिसॉर्टची ईडी चौकशी देखील झाली आहे.
परबांनी कथित रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैशांचा वापर केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याव्यतिरिक्त रिसॉर्ट बांधकामात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून तयार केल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच परबांसह तीन जणांविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परबांवर गुन्हा नोदं झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्वीट करत दिली आहे.
#Dapoli Resorts Farud. FIR registered against #AnilParab & others under IPC 420
दापोली रिसॉर्ट्स घोटाळा. अनिल परब आणि इतरांविरुद्ध आयपीसी 420 अंतर्गत एफआयआर गुन्हा दाखल @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/dIBjoOXYFy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 8, 2022
दापोली येथे असलेले साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी पर्यावरण मंत्रालय तोडण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशानुसार 90 दिवसांत हे रिसॉर्ड तोडण्याचे आदेश सांगितले होते. परंतु, या रिसॉर्टला 90 दिवस पूर्ण झाले असूनही हे रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टमध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.