HW News Marathi
राजकारण

“जिथे जिथे मंत्री येतील, तिथे तिथे त्यांना विचारा ‘देता की जाता ?”, आदित्य ठाकरेंचे आवाहन

मुंबई | राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना भेटतील तिथे “देता की जाता ?” हे विचारा असे आवाहन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केलेय. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. औरंगबाद इथे आज (8 नोव्हेंबर)  आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले . यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला.

 

महाराष्ट्र देशाला आजवर दिशा देत आलाय. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, सुपीक जमीन आहे. कुशल तरुण आहेत. पण, या राज्यातून प्रकल्प राज्यातून परत जातायत. पर राज्यात प्रकल्प जाण्याचे वाईट वाटत नाही, तर आपल्या राज्यातून प्रकल्प इथे न थांबता परराज्यात जातायत त्याचे वाईट वाटतेय. महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही तर देश मागे जाईल. पण, महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकलेत असे म्हणत स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार ?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना करत जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केलेय.

 

गृहमंत्र्यांना आजवर एवढे हतबल पाहिले नाही

राज्यातील प्रकल्प गेले तरी मोठा प्रकल्प राज्यात आणू म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते आणू शकले नाहीत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी म्हटले की ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढे हतबल आजवर कधीही पाहिले नाही. आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही, असे म्हणत संभाजीनगर इथल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गद्दार आमदार म्हणतात चुन चुन के मारेंगे, खरे तर मागे पाठीत वार करणारे पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे. तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करते. पण कारवाही होत नाही. तर काही मंत्री संवीधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करते. पण, तरीही कोणितीही कारवाही न करता केवळ समज दिली जाते .

Related posts

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

News Desk

“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” जे. पी. नड्डा यांचे मोठे विधान

Aprna

मसूद प्रकरणी मोदींनी पाकिस्तानचे दात घशात घातले, कमाल झाली !

News Desk