HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मला जिवे मारण्याचा कट । तेज प्रताप यादव

पाटणा | लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज (ता.१९) मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यासाठी सात राज्यात ५९ जागांसाठी मतदान होत आहे. यात ९१८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये हिंसाचाराने थैमान घातले आहे. बिहारमध्ये राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या  सुरक्षा रक्षकांनी कॅमरामॅनला मारहाण केली आहे.

तेज प्रताप मतदानाचा हक्क बजावून आल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या गाडीजवळ आले होते. परंतु  तेज प्रतापच्या गाडीचे विंडशिल्ड एका वृत्त वाहिनीच्या कॅमरामॅनकडून चुकून तुटल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला जबर मारहाण केली.

मला जिवे मारण्याच कट असल्याचे तेज प्रताप यांनी म्हटले आहे. तेज प्रताप पुढे असे देखील म्हणाले की, माझ्या सुरक्षा रक्षकांने काहीही केलेले नाही. उलट कॅमरामॅननेच माझ्या गाडीचे नुकसान केले असल्याचे म्हणत. मी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करून एफआयआर दाखल केली आहे.  या संपूर्ण प्रकरणा संदर्भात तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकावर केलेल्या आरोपाचे खंडन करत केले आहे.

Related posts

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार

News Desk

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk

संघाचे भय्याजी जोशी-नितीन गडकरी यांची बंद दाराआड १ तास चर्चा

News Desk