पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (१७ मार्च) निधन झाले. गेले अनेक महिने पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनानंतर आता गोव्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे गोवा काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले.
Goa: Union Minister and senior BJP leader Nitin Gadkari arrives in Panaji for the BJP legislature meet following the demise of Goa CM Manohar Parrikar. pic.twitter.com/yUPKZ2FKIp
— ANI (@ANI) March 17, 2019
एकीकडे काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबतच्या निर्णयासाठी एका मागोमाग एक बैठका घेतल्या जात आहेत. “आम्ही भाजपला नव्हे तर मनोहर पर्रीकर यांना समर्थन दिले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर आता भाजपच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. भाजपच्या निर्णयानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू”, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी गोव्यात दाखल झाल्यानंतर विजय सरदेसाई यांनी पक्षाच्या आमदारांसह त्यांची भेट घेतली.
रविवारी मध्यरात्री झालेल्या भाजपच्या बैठकीत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही तोडगा निघू न शकल्याची माहिती मिळत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे श्रीपाद नाईक यांचे नाव समोर येत होते. मात्र, राज्यातील मित्र पक्षांनी श्रीपाद नाईक यांच्या नावाला आपला विरोध दर्शविला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या मगोपच्या सुदीन ढवळीकर यांनी देखील गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.