HW News Marathi
राजकारण

येत्या काळात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल !

मुंबई | “येत्या काळात एखादा मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल”, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरच्या १६ व्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना या कार्यक्रमात असा प्रश्न विचारण्यात आला कि, २०५० सालापर्यंत एखादा मराठी व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि, इतिहासात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वेळी देशातील कानाकोपऱ्यात उत्तर प्रदेशपासून कटकपर्यंत मराठ्यांनी राज्य केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि संधी मिळाली तर एक मराठी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा; ‘या’ मुद्द्यांवर झाली बैठक

Aprna

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

swarit